By  
on  

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’च्या टीमसाठी वाईट बातमी, १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

एखाद्या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत असलेले वादा विवाद बॉलिवूडला नवीन नाहीत. या वाद विवादांना अनेकदा हिंसक वळण लागून सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार आल्याचंही दिसून येतं. द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमादेखील वादाच्या भोव-यात अडकण्याची शक्यता आहे.

हा सिनेमा निर्मितीपासूनच वादाच्या भोव-यात होता पण आता वादाचा फास आणखी आवळल्याचं दिसत आहे. हा सिनेमा एका राजकीय घराण्यावर नकारात्मक भाष्य करत असल्याचे आरोप होत होते. मनमोहन सिंग यांचे मिडिया सल्लागार असलेले संजय बारु यांच्या ‘द : अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमाची चर्चा त्याच्या निर्मितीपासूनच होती.

https://twitter.com/ANI/status/1082570565431439361

पण आता या वादाने वेगळं वळण घेतलं आहे. ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. त्यानंतर या सिनेमाभोवती वादाचं वलय जमा होऊ लागलं. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलरच युट्युबवरुन हटवला गेल्याची बातमीदेखील समोर आली होती.

https://twitter.com/ANI/status/1082564097185505280

याशिवाय हा सिनेमा विशिष्ट राजकीय घराण्याच्या विरोधात भाष्य करत असल्याचा आरोप ठेवून त्या विरोधात बिहारमधील न्यायालयात सिनेमावर बंदी घालण्याची याचिकाही दाखल करण्यात आली होती. वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. आज मंगळवारी मुझफ्फरपूर कोर्टात न्यायाधीशांनी अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशावर सिनेमा निर्मात्यांची अजूनतरी काही प्रतिक्रिया आलेली नाही. या आदेशामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Recommended

PeepingMoon Exclusive