By  
on  

कॉमेडियन ख्यालीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रसिद्ध स्टॅडअप कॉमेडियन आणि आम आदमी पक्षाचा ( आप ) कार्यकर्ता ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप आहे. एका 25 वर्षीय महिलेने  त्याच्यावर हा आरोप केला. नोकरीचं आमिष दाखवून त्याने जबरदस्ती केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं  आहे.  याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मानसरोवर पोलिसांनी ख्याली सहारनवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर येथील एक महिला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पण, नोकरीची गरज असल्याने दुसऱ्या महिलेच्या माध्यमातून ही महिला कॉमेडियनच्या संपर्कात आली.

दरम्यान, याप्रकरणावर आपने भाष्य केलं आहे. आपचे प्रवक्ता योगेंद्र गुप्ता यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, “आपचे लाखो कार्यकर्ते आहेत. त्यातील ख्याली एक आहे. ख्याली स्वत:च्या आयुष्यात काय करतो, याचा पक्षाशी काहीही संबंध नाही.”

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive