भारतीय मुलींना आळशी म्हणणा-या सोनाली कुलकर्णीला उर्फी जावेदने फटकारले

By  
on  

आपल्या सशक्त अभिनयाने मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. तिने भारतीय मुलींना आळशी म्हटलं होतं. मुलींना चांगले पैसे कमावणारा मुलगा पती किंवा बॉयफ्रेंड म्हणून हवा असतो, पण त्या स्वतः मात्र काहीच कमावत नाहीत, असं ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यानंतर काहींनी तिचं समर्थन केलंय, तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. तिचं हे वक्तव्य साफ चुकीचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं असून त्यावर संतापजनक प्रतिक्रीया मांडल्या आहेत. 

आपल्या अतरंगी-सतरंगी फॅशन सेन्समुळे सतत चर्चेत असणारी आणि बोल्ड राहणारी उर्फी जावेद सोनालीच्या या वक्त्व्यावर चांगलीच संतापलीय. ट्विट करत उर्फीने सोनालीच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत मुलींची बाजू ठामपणे मांडलीय. 

सोनालीचा व्हिडीओ ट्विट करत उर्फी म्हणते, “तू जे काही बोललीस ते किती असंवेदनशील होतं. आधुनिक काळातील महिला त्यांची नोकरी व घरातील कामं दोन्ही सांभाळतात, त्यांना तू आळखी म्हणतेस? चांगले पैसे कमावणारा नवरा हवा, अशी मुलींची इच्छा असेल तर त्यात गैर काय? शतकानुशतके पुरुषांनी स्त्रियांना फक्त मुलं जन्माला घालण्याचं मशीन म्हणून पाहिलं. लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून हुंडाही मागितला जातो. त्यामुळे महिलांनो, तुमच्या अटी व मागण्या मांडण्यास घाबरू नका. होय, महिलांनी काम केले पाहिजे, हे तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु हा एक विशेषाधिकार आहे जो प्रत्येकाला मिळत नाही.”

 

अनेकांना उर्फीचं म्हणणं पटलं आहे आणि त्यांनी समर्थन दर्शवलय.  

Recommended

Loading...
Share