सुपरस्टार्स नेहमीच झगमगाटी आणि ऐषोआरामी आयुष्य जगत असतील असं आपल्याला वाटत असतं. पण सर्वसामान्य आयुष्य जगण्याची कसर शुटिंग करताना अनेकदा भरून निघत असते. महानायक अमिताभ बच्चन सध्या असाच अनुभव घेत आहेत.
https://twitter.com/SrBachchan/status/1082729246110507008
अमिताभ बच्चन सध्या ‘झुंड’ या नागराज मंजुळेच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. या शुटिंगदरम्यान त्यांच्या व्यक्तिरेखेनुसार सामान्य आयुष्य जगणं कसं असतं याचा अनुभव घेता आला. त्यानिमित्ताने बिग बींना स्ट्रगलर असतानाच्या दिवसांची आठवण झाली. या शुटिंगदरम्यानचे अनेक फोटो बिग बींनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या शुटिंग दरम्यान त्यांना बाजल्यावर झोपावं लागलं. बैलगाडी आणि बसने प्रवासदेखील करावा लागला. एरवी आरामदायी आयुष्य जगत असलेल्या बिग बींच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बिग बी यशस्वी व्हायच्या आधी पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करायचे ही आठवणही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
https://www.instagram.com/p/BsZxYfchrJc/?utm_source=ig_web_copy_link
या अनुभवाने बिग बींना जुन्या काळात नेलं. अमिताभ बच्चन सध्या झुंडमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. हा नागराज मंजुळे यांचा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. या सिनेमामध्ये काम करण्यास बिग बीनी पहिल्यांदा नकार दिला होता. कालांतराने त्यांनी या सिनेमात काम करण्यास उत्सुकता दाखवली.