
जिच्या नावाने काळजाचा ठोका चुकतो ती बॉलिवुडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित. 'धकधक गर्ल' म्हणून प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालते.सौंदर्य आणि अदाकारी याचा सुंदर मिलाफ साधणा-या या अभिनेत्रीचं नृत्यावरचं प्रेम तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आजसुध्दा ही एव्हरग्रीन अभिनेत्री आपल्या अभिनयाने व मनमोहक अदांनी रसिकांना घायाळ करते. माधुरी दिक्षीत बाबत एक आक्षेर्पार्ह विधान नेटफिल्क्सच्या एका शोमध्ये केलं गेल्याचं म्हटलं जात आहे.
बिग बँग थिअरी या प्रसिद्ध शोमधल्या एका भागात अभिनेत्री माधुरी दीक्षित विषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी केला आहे. या प्रकरणी मिथुन विजय कुमार यांनी Netflix ला नोटीस बजावली आहे. एवढंच नाही तर मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सने हा भाग हटवावा अशीही मागणी केली आहे. जिम पार्सन्स या शोमध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय या दोघींची तुलना करतो. त्यानंतर त्याने एक वाक्य माधुरीबाबत उच्चारलं हे वाक्यच आक्षेपार्ह आहे असा आरोप मिथुन विजय कुमार यांनी केला आहे. मिथुन विजय कुमार यांनी याबाबतचं एक ट्वीटही केलंय.
Recently, I came across an episode of the show Big Bang Theory on Netflix where Kunal Nayyar's character uses an offensive and derogatory term to refer to the legendary Bollywood actress @MadhuriDixit. As a fan of Madhuri Dixit since childhood, I was deeply disturbed by the… pic.twitter.com/pvRCKd5Ne4
— Mithun Vijay Kumar (@MVJonline) March 22, 2023
मिथुन कुमार ट्विटमध्ये म्हणतात, "मी लहानपणापासूनच माधुरी दीक्षित यांचा फॅन आहे. त्यामुळे बिग बँग थिअरीमधली ती कमेंट ऐकून मला वाईट वाटलं. भारतीय संस्कृती आणि स्त्रिया यांचा अपमान झाल्याची भावना माझ्या मनात आली. त्यामुळेच मी माझ्या वकिलामार्फत नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यास सांगितलं. तसंच मी नेटफ्लिक्सला हा भाग काढून टाकण्याचीही विनंती केली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जाईल अशी अपेक्षा आहे.”