By  
on  

रामनवमीनिमित्त 'आदिपुरुष’चं नवं पोस्टर प्रदर्शित; प्रभासच्याबरोबरीने झळकला मराठमोळा अभिनेता

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' नंतरचा बिग बजेट सिनेमा 'आदिपुरुष' लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास स्टारर या सिनेमात सैफ अली खान, क्रिती सेनॉन , सनी सिंह आणि आपला मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे झळकतोय. देवदत्त या सिनेमात हनुमानाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रामनवमीच्या निमित्ताने दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ‘आदिपुरुष’चे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे. “मंत्रो से बढके तेरा नाम जय श्रीराम” असा कॅप्शनदेखील दिला आहे. या पोस्टर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन सीता आणि अभिनेता सनी सिंह लक्ष्मणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर देवदत्त विरपुत्र हनुमान साकारतोय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Om Raut (@omraut)

 

 

 हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात ३डी मध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती. तसेच हा चित्रपट हिंदीबरोबरच तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive