By  
on  

बायोपिकच्या यादीत ‘गुल मकई’ या सिनेमाचाही समावेश, या व्यक्तीच्या आयुष्यावर आहे हा सिनेमा

सध्या सिनेसृष्टीत बायोपिकची लाट आहे असं म्हट्लं तर वावगं ठरणार नाही. कारण आता ‘गुल मकई’ नावाचा बायोपिक प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई हिच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाचं स्क्रिनिंग लंडनमध्ये होणार आहे. २५ जानेवारीला या सिनेमाचं लंडनमध्ये केवळ ४५० निमंत्रितांच्या उपस्थितीत स्क्रिनिंग होणार आहे. या स्क्रिनिंगला मलाला युसुफजाई आणि तिचे आई वडिलही उपस्थित असतील.

या सिनेमाचे दिग्दर्शक अमजद खान यांना हा सिनेमा भारतात कधी प्रदर्शित होणार याबाबत विचारलं असता त्यांनी हा सिनेमा भारतात एप्रिलमध्ये प्रदर्शित केला जाईल असं सांगितलं. या सिनेमात अतुल कुलकर्णी आणि दिव्या दत्ता मलालाच्या पालकांच्या भूमिकेत असतील. मलालाची व्यक्तिरेखा रिम शेख साकारत आहे. या सिनेमात दिवंगत अभिनेते ओम पुरी अणि मुकेश ऋषी यांच्यादेखील विशेष भूमिका आहेत.

लंडनमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा युनाटेस नेशन्सच्या न्युयॉर्क हेड्क्वार्टर्समध्ये दाखवला जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive