By  
on  

प्रियांका चोप्राची लेक पहिल्यांदाच भारतात, चाहते म्हणतात “परिणीतीच्या लग्नासाठी…”

बॉलिवूड गाजवल्यानंतर विदेशातसुध्दा आपला डंका वाजवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच स्व:ताला सर्वांपेक्षा वेगळं सिध्द करण्यात पुढे असते. प्रियांका आणि तिचे पती निक जोनास यांनी गेल्या वर्षी सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला. मालती मेरी असं प्रियांकाच्या लेकीचं नाव आहे. 2018 साली प्रियांका हॉलिवूड सिंगर निक जोनास सोबत विवाहबध्द झाली होती आणि तिथेच ती स्थायिक झाली. 

प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात प्रियांकाने गुलाबी रंगाचा  को -ऑर्डर परिधान केला आहे. तर निक जोनस हा हुडी, जिन्स आणि कॅप  असा कॅज्नयुएल उभा आहे. तर प्रियांकाने लेकीला छानसा फ्रॉक घातला आहे. यावेळी प्रियांका ही खूपच आनंदात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे प्रियांकाची लेक मालतीवर सर्व पापाराझींच्या नजरा खिळल्या आहेत. 

 

 

दरम्यान, प्रियांका भारतात तिचा आगामी सिनेमा ‘सिटाडेल’चे प्रमोशन करण्यासाठी आल्याचे बोलले जात असेल तरी तिची चुलत बहिण व अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आलं आहे. आप खासदार राघव चढ्ढा यांच्या सोबत ती लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासाठीच प्रियांका भारतात आल्याच्या चर्चा आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive