‘इंडियन आयडल’च्या १३ व्या पर्वानं नुकताच निरोप घेतला. या तेराव्या पर्वाचा ग्रँड फिनाले काल म्हणजे रविवारी २ एप्रिल रोजी पार पडला.
ऋषी सिंह यानं १३ व्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं आहे. ‘इंडियन आयडॉल १३’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर ऋषीवर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. विजेत्या ऋषी सिंहला ‘इंडियन आयडॉल १३’ च्या ट्रॉफीसह २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि मारुती सुझुकी एसयूव्ही कार भेट म्हणून मिळाली आहे. याशिवाय त्याला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा कॉन्ट्रॅक्टही मिळाला आहे.
‘इंडियन आयडल’च्या १३ व्या पर्वाचा विजेता कोण होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ऋषीसोबत चिराग कोतवाल, सोनाक्षी कर, बिदिप्ता चक्रवर्ती, शिवम सिंह ,देवोस्मिता हे स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. सगळ्यांना मागे सारत ऋषीनं ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
दत्तक मुलानं आयुष्याचं सोनं केलं अशी प्रतिक्रिया त्याच्या पालकांनी दिली आहे. ऋषी सिंह मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. सध्या तो डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठात शिकतोय.