By  
on  

अजय देवगणला मिळाला नवा मित्र, “टोटल धमाल’ च्या सेटवर दिसली ही अजब दोस्ती

अजय देवगण सध्या फॉर्मात आहे म्हटलं तर चुकिचं ठरणार नाही. ‘सिंबा’मधील धडाकेबाज कॅमिओमध्ये सिंबा आला तरी सिंघमचा करिष्मा कायम असल्याचंच दिसलं. अजय आता त्याच्या आगामी सिनेमांच्या तयारीला लागला आहे अलीकडेच त्याचा तानाजी सिनेमातील लूक व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आगामी टोटल धमाल मधील लूक व्हायरल होत आहे. सिनेमा समीक्षक तरन आदर्श यांनी ट्वीट्द्वारे अजयचा लूक सगळ्यांसमोर आणला आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1084701240099975168

यामध्ये अजय एकदम रफ अ‍ॅण्ड टफ लूकमध्ये दिसत आहे. गॉगल घातलेल्या अजयच्या खांद्यावर एक माकडाचं पिल्लू आहे. अगदी बिनधास्त बसलेल्या या पिल्लाकडे पाहून सिनेमात अजयची आणि त्याची मैत्री पहायला मिळेल यात शंका नाही. टोटल धमाल या सिनेमातून अनिल कपूर आणि माधुरी दिक्षित अनेक वर्षांनी एकत्र काम करत आहेत. हा सिनेमा २२ फेब्रुवारी २०१९ रोजी रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive