By  
on  

रॅपर रणवीर प्रेक्षकांसमोर नव्या अंदाजात, गली बॉयमधील या गाण्याला दिला आवाज

‘असली हिप हॉपसे मिलाये हिंदुस्थान को म्हणत रणवीरच्या गली बॉयने प्रदर्शनापूर्वीच रसिकांची मनं जिंकली आहेत. रणवीर आलियाची केमेस्ट्री असो किंवा रणवीरचा बिनधास्त अंदाज. पण सध्या इंटरनेट सेन्सेशन बनलं आहे ते रणवीरचं नवं गाणं. गली बॉयमधील ‘अपना टाईम आयेगा’ या गाण्याने धुमाकुळ घातला आहे.

नावेदच्या व्यक्तिरेखेत असलेल्या रणवीरने रॅपर बनण्याची ओढ, तगमग सगळं या गाण्यात उतरवलं आहे. या गाण्याची खास बात म्हणजे हे गाणं खुद्द डिव्हाईनने लिहिलं आहे. या सिनेमा रॅपर डिव्हाईनच्याच आयुष्यावर बेतला आहे. डाब शर्मा आणि डिव्हाईनने हे गाणं कंपोज केलं आहे. रणवीरने या गाण्याला त्याचा आवाज दिला आहे. गाण्यात रणवीरचा उत्साह नेहमीप्रमाणे ओसंडून वाहताना दिसत आहे.

हे गाणं रिलीज होऊन काहीच वेळ लोटला आहे. पण युट्युबवर या गाण्याला 2 लाखापेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. हा सिनेमा लवकर रिलीज व्हायची वाट प्रेक्षकही बघत आहेत. हा सिनेमा १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हेलेंटाइन डे ला रिलीज होणार आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=130&v=jFGKJBPFdUA

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive