By  
on  

‘पती, पत्नी और वो’ मध्ये दिसणार अनन्या पांडे, कार्तिकसोबत ऑनस्क्रीन केमेस्ट्री रंगणार

बॉलिवूडमध्ये ‘पती, पत्नी और वो’ चा रिमेक बनत असल्याचं वृत्त पीपिंगमून ने आधीच दिलं होतं. आता या सिनेमासंदर्भात आणखी एक वृत्त समोर आलं आहे. या सिनेमात कार्तिकसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची चर्चा होती. सुत्रांच्या माहितीनुसार, या सिनेमात कार्तिकसोबत अनन्या पांडे झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अनन्याला या सिनेमाची स्क्रिप्ट आवडल्याने या सिनेमात काम करण्यास होकार दिल्याचं अनन्याने सांगितलं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कार्तिक आणि अनन्या यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर पकडला होता. अशा वेळीच हे दोघं एकाच सिनेमात झळकणार असल्याने यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्रीही प्रेक्षकांना पाहता येईल.

१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केलं होतं. विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता त्याच्या रिमेकलाही असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा निर्माता जुनो चोप्रा यांना वाटते. या कथानकात काळानुसार बदल आणि मॉडर्न टच दिला जाणार असल्याचंही निर्मात्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive