By  
on  

प्रतिक्षेची वेळ संपली, टोटल धमालचं पोस्टर रिलीज पाहा कोण कोण आहे त्यात?

 

धमाल ही फ्रेंचाईझी चाहत्यांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. या सिरीजचा आणखी एक सिनेमा रसिकांना खळखळून हसवण्यासाठी तयार झाला आहे. टोटल धमाल असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं असून ट्रेलर २१ जानेवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात माधुरी आणि अनिल कपूर जवळपास १७ वर्षांनी एकत्र झळकणार आहेत. आज पर्यंत अनेक हिट सिनेमांची ही प्रसिद्ध जोडी आता टोटल धमाल करण्यास सज्ज झाली आहे.

या सिनेमाच्या पोस्टरमध्ये कलाकारांची फौज दिसत आहे. या पोस्टरमध्ये सगळ्यात पुढे आहे तो अजय देवगण. अजयने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की ‘आज पासून केवळ टोटल धमाल होणार! ट्रेलर २१ जानेवारीला.’

या पोस्टरमध्ये अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, जॉनी लिवर, अरशद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आणि संजय मिश्रा दिसून येत आहेत. हा सिनेमा २२ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे

https://www.instagram.com/p/Bsw6SFKAPMi/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive