By  
on  

चर्चा अंदाज अपना अपनाच्या रिमेकची ही बॉलिवूड जोडी साकारणार अमर-प्रेमची व्यक्तिरेखा

मराठी सिनेसृष्टीत अशी ही बनवा बनवी सिनेमाला हे स्थान रसिकांच्या मनात आहे, तीच जागा अंदाज अपना अपना या बॉलिवूडपटालाही आहे. पंचवीस वर्षंपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची जादू अजूनही रसिकांच्या मनावर कायम आहे.

प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या या सिनेमात आमीर आणि सलमान हे दोघे खानबंधू झळकले होते. त्यांच्यासोबत या सिनेमात रवीना टंडन आणि करिष्मा कपूर यादेखील होत्या. या सिनेमातील क्राईम मास्टर गोगो, तेजा, रॉबर्ट या व्यक्तिरेखा आजही रसिकांच्या चांगल्या स्मरणात आहेत. याच सुपरहिट सिनेमाचा रिमेक आता रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अमर-प्रेमची व्यक्तिरेखा रणवीर आणि वरुण धवन साकारणार असल्याची माहिती मिळाली.

या सिनेमाच्या निर्मितीची धुरा प्रिती आणि विनय सिन्हा सांभाळत आहे. हा सिनेमा जुन्या ‘अंदाज अपना अपना’चा सिक्वेल नसणार हे निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. या सिनेमाची गोष्ट जुन्या सिनेमापेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचंही त्यांनी सांगितलं. क्राईम मास्टर गोगोची व्यक्तिरेखा मात्र शक्ती कपूरच साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive