By  
on  

बॉलिवूडचा राऊडी मॅन अक्षय कुमारने ट्वीट करून दिल्या ठाकरे सिनेमाला शुभेच्छा

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव अभिनीत ठाकरे सिनेमा नुकताच रिलीज झाला. शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. अशावेळी खिलाडी कुमार या सिनेमाचं कौतुक करण्यात कसा मागे राहील. आदित्य ठाकरे आणि अक्षय कुमार अत्यंत चांगले मित्र आहेत.
त्यामुळे या सिनेमाच्या रिलीजनंतर अक्षयने ट्वीट करून या सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय त्याच्या ट्वीट्मध्ये म्हणतो, ‘ठाकरे सिनेमाच्या रिलीजसाठी मी आदित्य ठाकरे शुभेच्छा देतो. हा सिनेमा आदित्यच्या आजोबांच्या आयुष्यावर बेतला आहे याचा मला आनंद आहे. बाळासाहेबांच्या कार्याबद्दल आतापर्यंत केवळ ऐकलं होतं. पण त्यांच्या जीवनपट पडद्यावर पहायचा आनंद वेगळाच आहे यात शंका नाही.’
आदित्य ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आहेत. याशिवाय आदित्य यांना कविता लिहिण्याचाही शौक आहे. अक्षय आणि आदित्य यांना अनेकदा मुंबईमधील अनेक कार्यक्रमात एकत्र पाहिलं गेलं आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/1088655409475452928

Recommended

PeepingMoon Exclusive