By  
on  

लुका छुपी सिनेमातील हे गाणं ऐकलं का, पाहा कृती-कार्तिकच्या जोडीची धमाल

कार्तिक आर्यन आणि कृती सॅनॉन अभिनीत लुका छुपी सिनेमातील ‘ये खबर छ्पवादो अखबार मे’ हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात कृती-कार्तिकची केमेस्ट्री उत्तम जमली आहे. मिका सिंह आणि सुनंदा शर्मा यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. व्हाईट नॉईज स्टुडिओजने हे गाणं कंपोज केलं आहे.

https://twitter.com/TheAaryanKartik/status/1089849585344888832

मुळात हे गाणं अक्षयकुमारच्या अफलातून या सिनेमातील आहे. लुका छुपीमध्ये त्याचं रिमीक्स वर्जन सादर केलेलं आहे. खरं तर जुनी गाणी रिक्रिएशन केल्यांनंतर मूळ कलाकारांना अनेकदा आक्षेप असतो. पण अक्षयकुमार मात्र त्याच्या गाण्याचं हे रिक्रिएशन एंजॉय करताना दिसत आहे. अलीकडेच कार्तिक आर्यनने या गाण्यावर डान्स करताना अक्षयचा आणि कृतीचा व्हिडिओही शेअर केला आहे. जवळपास २१ वर्षांनी हे गाणं नव्या रुपात समोर आलं आहे. दिनेश विजान हे लुका छुपीचे निर्माते आहेत. लक्ष्मण उतेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=FF_RF7mrbkY

Recommended

PeepingMoon Exclusive