By  
on  

कलाकारांच्या मांदियाळीत माधुरीच्या ठुमक्यांचा जलवा, टोटल धमालचं पहिलं गाणं रिलीज

मल्टीस्टारर सिनेमा टोटल धमालचा ट्रेलर सगळीकडे धमाल करत असताना या सिनेमातील गाणंही अलीकडेच रिलीज झालं आहे. या गाण्यात माधुरीचे ठुमकेही रसिकांना अभुवता येतील. ‘पैसा-पैसा’ असे बोल असलेल्या या गाण्यात प्रत्येकजण पैशाच्या शोधात असल्याचं दिसून येत आहे. रितेश देशमुख पासून जावेद जाफरीपर्यंत प्रत्येकजण या गाण्यात ५ करोड रुपयांच्या शोधात आहे.

५ करोडचा शोध या सिनेमातील मुख्य कथासुत्र आहे. त्याअनुषंगाने या सिनेमात प्रसंग घडत जातात. या गाण्याचे बोल कंवर जुनेजा यांनी लिहिले आहेत. देव नेगी, सुभ्रो गांगुली आणि अर्पिता चक्रवर्ती यांनी हे गाणं गायलं आहे. गौरव आणि रोशिन यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. हे गाणं ऋषी कपूर यांच्या कर्ज सिनेमातील पैसा यह पैसा गाण्याचं रिक्रिएशन आहे. आता सिनेमातीला या गाण्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळते का ते लवकरच कळेल.

https://www.youtube.com/watch?v=Wm-pQ1KKqLU

Recommended

PeepingMoon Exclusive