प्रसिद्ध भोजपूरी अभिनेता रवीकिशन याची मुलगी रीवा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. रीवा नितीन मनमोहन यांच्या ‘सब कुछ मंगल है’ या सिनेमातून पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे नितीन मनमोहन यांच्या सिनेमाने रवीकिशनची बॉलिवूडमध्ये छाप पडली होती. आता रिवाही याच दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करणार असल्याने रवीकिशनसाठी तिचं पदार्पण अधिकच खास बनलं आहे.
रिवासोबत पद्मीनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांकही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याशिवाय अक्षय खन्नाही या सिनेमात दिसेल. रिवाच्या पदार्पणाबद्द्ल रवीकिशन म्हणतो, रिवाचं लहानपण माझा अभिनय पाहात गेलं आहे. त्यामुळे तिला देखील या क्षेत्रात करीअर करायचं आहे. या क्षेत्रात तिचं भविष्य उज्वल असेल यात शंका नाही. रिवाने अमेरिकेतून अभिनयाचं रितसर प्रशिक्षणही घेतलं आहे.