By  
on  

डॉली, किट्टी और वो चमकते सितारे या सिनेमाचं शुटिंग संपन्न, कलाकारांनी शेअर केले फोटो

निर्माती अलंकृता श्रीवास्तवने भूमी पेडणेकर आणि कोंकणा सेनशर्मा अभिनीत डॉली, किट्टी और वो चमकते सितारे सिनेमाचं शुटिंग पूर्ण केलं आहे. या निमित्ताने सेट्वर जल्लोष होता. अलंकृताने टीमसोबतच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

त्या आपल्या ट्वीट्मध्ये म्हणतात, ‘डॉली, किट्टी और वो चमकते सितारेचं शुटिंग पूर्ण झालं. मी खुष आहे. कोंकणा, भूमी आणि पूर्ण टीमला अनेक धन्यवाद’. यासोबत सेलिब्रेशनचे फोटोही आहेत.

https://twitter.com/alankrita601/status/1090472497936519171

डॉली, किट्टी और वो चमकते सितारेमध्ये कुब्रा सैत, विक्रांत मैसी, अमोल पाराशर आणि करण कुंद्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली शोभा कपूर, एकता कपूर आणि आशिष कपूर यांची निर्मिती आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive