By  
on  

आता बनणार जॉर्ज फर्नांडिस यांचा बायोपिक, यांच्या हाती आहे दिग्दर्शनाची धुरा

सध्या बायोपिकचं वारं आहे असं म्हटलं तर चुकिचं ठरणार नाही. जानेवारी महिन्यात तीनहून अधिक बायोपिक प्रदर्शित झाले. आगामी काळतही अनेक बायोपिक रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

नुकतेच दिवंगत झालेले नेते जॉर्ज फर्नांडिस यांचा बायोपिक बनवण्याची इच्छा नुकतीच संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ‘ठाकरे’ नंतर हा संजय यांचा दुसरा सिनेमा असेल. या सिनेमाचं दिग्दर्शन शुजित सरकार करणार आहेत.

पण विशेष म्हणजे जॉर्ज यांची पत्नी लैला फर्नांडिस यांनी राऊत यांना पत्र लिहून हा सिनेमा बनवायला विरोध दर्शवला आहे. लैला यांच्यामते, ‘सिनेमातील काही घटनांमध्ये तथ्यांश आहे का तपासण्याची जबाबदारी घेतली जातेच असं नाही. त्यामुळे जॉर्ज यांच्या आयुष्यातील काही घटनांचा चुकिचा अर्थ लावला जाऊ शकतो. याशिवाय संजय यांनी आम्हाला विश्वासात घेण्यापूर्वीच हा सिनेमाची घोषणा केली आहे. खरं तर यापूर्वी त्यांनी जॉर्ज यांच्या कुटुंबाची परवानगी घेणं गरजेचं होतं. पण निर्मात्यांनी हे केलं नाही.’ यावर संजय यांचं मत कळू शकलेलं नाही.

बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे संबंध अत्यंत चांगले होते. यांच्यातील मैत्री पडद्यावर दाखवण्याची इच्छा संजय यांना आहे. ही इच्छा पूर्ण होते की नाही हे लवकरच कळेल.

 

Recommended

PeepingMoon Exclusive