By  
on  

घरी मोकळ्या वातवरणात वाढले असल्याने स्वत:ला नशिबवान समजते‌ - सोनम कपूर

सोनम कपूरचा सिनेमा एका लडकी को देखा तो ऐसा लगा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमातून अत्यंत वेगळा विषय हाताळला गेला आहे. या सिनेमात सोनम समलैंगिकता या विषयानुरुप काम करताना दिसत आहे. खरं तर समलैंगिकता या विषयाबद्दल सोनमचं मत स्पष्ट आहे. सोनमला समलैंगिकता या विषयाबद्द्ल कधीच अवघडल्यासारख वाटलं नाही. याचं क्रेडिट ती घरातील मोकळ्या वातावरणाला देते.

सोनम म्हणते, माझी आई फॅशन क्षेत्राशी संबंधित आहे. तिचे बरेचसे मित्र, सहकारी समलैंगिक आहेत. माझेही अनेक मित्र-मैत्रिणी समलैंगिक आहेत. त्यामुळे याविषयाबद्दल मला कधीच अवघडलेपण वाटलं नाही.  माझ्यावर आणि भाऊ हर्षवर्धनवर अत्यंत मोकळ्या वातावरणाचे संस्कार झाले आहेत. त्याबाबत आम्ही दोघेही स्वत:ला खुप नशिबवान समजतो.

समलैंगिकतेवरील या सिनेमात सोनमसोबत तिच्या वडिलांनीही काम केलं आहे. त्याविषयी विचारलं असता सोनम म्हणते, मला या सिनेमात वडिलांसोबत काम करताना अजिबात अस्वस्थ वाटलं नाही. विचारांमध्ये स्पष्टता असल्याने कसलीच अडचण आली नाही.’

 

Recommended

PeepingMoon Exclusive