By  
on  

रणवीरच्या ‘८३’ची स्टारकास्ट होत आहे जाहीर, पाहा कोण कोण कलाकार आहेत क्रिकेटरच्या भूमिकेत

यशस्वी दिग्दर्शक अशी ओळख असलेले कबीर खान यांच्या ८३ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. कारण हा सिनेमा क्रिकेटवर आधारित आहे. या सिनेमात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला विश्वचषक जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला जात आहे. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.
या सिनेमात कपिलदेवची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे. काही दिवसातच या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होईल. रणवीरने कपिल देव यांची व्यक्तिरेखा परिपूर्ण साकारण्यासाठी मेहनत घ्यायलाही सुरुवात केली आहे. या सिनेमाच्या इतर कास्टींगवरही काम सुरु आहे. यात कृष्णम्माचारी श्रीकांत यांची व्यक्तिरेखा दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार विकेटकीपर सय्यद किरमानी यांची व्यक्तिरेखा युट्युब स्टार साहिल खट्टर साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या संबधीची एक पोस्ट प्रॉड्क्शन हाऊसकडून नुकतीच सोशल मिडियावर अपलोड केली गेली आहे. साहिलचा लूक सय्यद यांच्या लूकशी मिळता जुळता असल्याचं या पोस्टमधून दिसून येत आहे.

https://twitter.com/RelianceEnt/status/1091245695686795264

https://www.instagram.com/p/BsiGTekhsJp/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive