By  
on  

लंडन थीम वर आधारलेली असेल करण जोहरच्या यश आणि रुहीची बर्थ डे थीम

मुलांच्या वाढदिवसाचं पालकांना कोण कौतुक असतं. यश आणि रुही या दोन मुलांचा पिता असलेला करण जौहर तरी याला कसा अपवाद असेल. त्यामुळेच त्याच्या जुळ्यांचा वाढदिवस त्याने खास पद्धातीने साजरा करण्याचं ठरवल आहे.

याविषयी एक्सक्लुसिव्हली पीपिंगमूनशी बोलताना करण म्हणाला की, ७ फेब्रुवारीला ताज लॅण्ड्स एण्ड्ला यश आणि रुहीचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात येईल. यासाठी बॉलिवूडमधील ४५ स्टार किड्स आणि त्यांचे आई वडिल उपस्थित असतील. या पार्टीची थीम असेल लंडन थीम. लंडन करणचं आवडतं शहर आहे. यश आणि रुही मात्र अजून लंडनला गेले नसले तरी बाबा करणने मात्र बर्थ डे ला ही थीम साकारण्यात कोणतीही कसर ठेवणार नसल्याचं सांगितलं आहे.

७ तारखेला ताजचा बैंक्वेट हॉल एरिया लंडनमध्ये बदलला जाईल. या थीममध्ये डबल डेकर बस, पोस्ट बॉक्स, टेलिफोन बुथ हे दाखवलं जाईल.  तैमूर अली खान, आदिरा चोप्रा, लक्ष्य कपूर, आहिल शर्मा, इनाया नौमी खेमू, विआन राज कुंद्रा यांच्यासहित अन्य स्टार किड उपस्थित असतील.

https://www.instagram.com/p/Bmfa1ErFCCl/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive