By  
on  

ताहिरा कश्यपने केला शेअर केला हा फोटो, नेटिझन्सनी दिली धैर्याची दाद

अभिनेता आयुष्मान खुराणाची पत्नी आणि शॉर्ट्फिल्म दिग्दर्शक ताहिरा कश्यपने कॅन्सर डेच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून प्रत्येकजण ताहिराच्या धैर्याची दाद देत आहे. या फोटोमध्ये ताहिरा टॉपलेस आहे. यामध्ये तिच्या पाठीवर ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीमुळे पडलेले टाके दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना ती म्हणते, ‘आज माझा दिवस आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनींच हा दिवस सेलिब्रेट करायला हव. त्यामुळे या आजरासंबंधी असलेल्या सगळ्या धारणा दूर होतील. हा फोटो काढण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठी खुप कठीण होतं. पण हा दिवस कोणत्याही चुकिच्या धारणांशिवाय साजरा व्हावा असं मला नेहमी वाटतं.’

https://www.instagram.com/p/Btc5zgvAmsV/?utm_source=ig_web_copy_link

ताहिरा अलीकडेच लॅक्मे फॅशन वीकमध्येही दिसून आली. तिने एका स्पोर्ट्स वेअर ब्रॅण्ड्साठी रॅम्प वॉकदेखील केला. त्यावेळी बाल्ड लूकमध्ये असलेल्या ताहिराने व्हाईट ड्रेस घातला होता. त्यावेळी तिचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. ताहिराच्या आयुष्यातील हा पहिलाच रॅम्प वॉक होता. यावेळी ती खुपच आनंदी दिसत होती

https://www.instagram.com/p/BtYx_16gZYp/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive