By  
on  

असा सुचला 'हाऊज द जोश’ ! सांगतोय उरीचा दिग्दर्शक आदित्य धर

सध्या देशभर धुमाकुळ घालत असलेला सिनेमा म्हणजे ‘उरी’. विकी कौशल अभिनीत हा सिनेमा २०१९चा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा बनला आहे. आतापर्यंत रेकॉर्डतोड कमाई या सिनेमाने केली आहे.या सिनेमाने लोकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील ‘हाऊज द जोश’ हा घोषणेचं वारं सगळीकडे आहे. इतकंच कशाला, खुद्द पंतप्रधानांनाही ही घोषणा देण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे सिनेमा इतक्याच प्रसिद्ध झालेल्या या घोषणेबद्द्ल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच होती.

याविषयी दिग्दर्शक आदित्य धर यांना विचारलं असता त्यांनी एक मजेदार किस्सा सांगितला. तो म्हणाला, 'माझ्या काही मित्रांचे वडील सैन्यदलात होते. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा आर्मी क्लबमध्ये जायचो. दिल्लीत एक जागा होती जिथे आम्ही जायचो. तेव्हा तिथे सैन्यदलातील एक निवृत्त अधिकारी यायचे. क्लबमध्ये आलेल्या सगळ्या लहान मुलांना ते आपल्या समोर रांगेत उभे करायचे आणि त्यांच्या हातात एक मोठ्ठं चॉकलेट असायचं. ते आम्हा मुलांना विचारायचे 'हाउ इज द जोश?' आणि मग आम्ही सगळे जोरात ओरडायचो 'हाय सर!' जो मुलगा सगळ्यात मोठ्याने या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला ते चॉकलेट मिळत असे. हे चॉकलेट मिळवण्यासाठी मीही अगदी जीवतोडून ओरडायचो असंही यावेळी आदित्यने सांगितलं. लहानपणीची ही आठवण लक्षात ठेवून सिनेमात हा डायलॉग वापरल्याचं त्याने सांगितलं.

https://www.youtube.com/watch?v=mj2asf2to7k

Recommended

PeepingMoon Exclusive