By  
on  

मी आता सुपरहिरो साकारायच्या वयाचा नाही: सलमान खान

रोहीत धवनच्या आगामी साय-फाय सिनेमात सुपरहिरोची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता अजूनही कायम आहे. या सिनेमासाठी सिनेमातील नामांकित नावांची चर्चा होती. या सिनेमातील सुपरहिरोच्या व्यक्तिरेखेसाठी हृतिक रोशनच्या नावाची चर्चा होती. पण नंतर सलमान हृतिकची जागा घेणार असल्याचं समोर आहे.
पिपींगमूनने याविषयी सलमानला छेडलं असता तो म्हणतो, सुपरहिरो साकारणं कितीही चांगलं वाटत असलं तरी आता ते शक्य नाही. कारण आता मी सुपरहिरोच्या वयाचा वाटत नाही.’ सलमानच्या या प्रांजळ कबुलीनंतर सलमान या सिनेमात काम करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पण सलमानने आगामी काळात रोहीतसोबत काम करण्याचं आश्वासनही दिलं आहे.
खरं पाहता हृतिक या सिनेमासाठी राजी आहे पण हे संपूर्ण वर्ष तो या सिनेमाला देऊ शकणार नाही. यावर्षी तो क्रिशच्या कामाला लागेल. सलमान सध्या अली अब्बास जफरच्या ‘भारत’मध्ये व्यस्त आहे. त्यानंतर तो दबंग ३ च्या शुटिंगला सुरुवात करेल. एकुण काय भाईचं शेड्युल सध्या टाईट आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive