By  
on  

Exclusive: मोदींच्या बायोपिकआधी राहुल गांधी यांच्यावरील बायोपिकचा ट्रेलर रिलीज

सध्या बायोपिकच्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची घोषणा होताच राहुल गांधी यांच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे राजकारणाच्या आखाड्याप्रमाणेच बॉक्सऑफिसवरही हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील का हे पाहणं रंजक ठरेल.

‘माय नेम इज रा गा’ असं या बायोपिकचं नाव आहे. लोकसभेच्या निवडणुकीआधी महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीवर प्रदर्शित होणारा हा तिसरा बायोपिक असेल. याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘द अ‍ॅक्सिडेंट्ल प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जीवनावर सिनेमा बनवला जाणार असल्याची घोषणा आणि फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला होता. आता राहुल गांधी यांच्या जीवनावर सिनेमा बनवला जाणार आहे. मोदींवरील बायोपिकच्या आधी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

रुपेश पॉल हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी, प्रियांका वद्रा, नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांची झलक दिसून येत आहे. राहुलच्या लहानपणापासून ते राजकिय करीअरपर्यंत घडलेल्या घटनांचा आलेख या सिनेमात मांडला जाणार आहे. दिग्दर्शकाच्या मते, या सिनेमात राहुलच्या प्रतिमेचा उदो उदो करण्यात आलेला नाही. उलट सगळीकडून आरोपांच्या फैरी झडत असताना समोर आलेल्या आव्हांनांना पेलणा-या व्यक्तीविषयी हा सिनेमा आहे. संकटाशी दोन हात करत असलेली प्रत्येक व्यक्ती या सिनेमाशी स्वत:ला जोडून घेईल असा विश्वासही दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे. हा सिनेमा सात एप्रिलला रिलीज होईल.

https://www.youtube.com/watch?v=BEO9ur9IuNw

Recommended

PeepingMoon Exclusive