By  
on  

पुन्हा एकदा तापसीच्या मदतीसाठी धावले अमिताभ, 'बदला'चा ट्रेलर रिलीज

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन अभिनित बदला सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर सिनेमाविषयीची उत्कंठा वाढवणारा आहे यात शंका नाही. ट्रेलरच्या सुरुवातीलाच सिनेमात मर्डर मिस्ट्री असल्याचं लक्षात येतं. या खुनाचे धागेदोरे तापसीच्या आसपास कुठेतरी असल्याचं जाणवत राहतं. या सिनेमात अमृता सिंगदेखील दिसते पण अगदी काही क्षणापुरती.

या सिनेमात अमिताभ एका वकिलाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. बादल गुप्ता असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. गेल्या ४० वर्षांत एकही केस न हरलेला वकील अशी बादल गुप्ता यांची ख्याती आहे.

https://www.youtube.com/watch?v=mSlgu8AQAd4

हा सिनेमा सुजॉय घोष यांनी दिग्दर्शित केला आहे. सुजॉय यांनी यापूर्वी ‘कहानी’, ‘कहानी 2’ सारखे शानदार चित्रपट दिले आहे. अमिताभ तापसी या जोडीचा या दुसारा सिनेमा आहे. या जोडीने सर्वप्रथम पिंक या सिनेमात काम केलं होतं. विशेष म्हणजे या सिनेमातही अडचणीत सापडलेल्या तापसीची सुटका वकिलाच्या व्यक्तिरेखेतील अमिताभ करतात. बदलामध्ये हेच पुन्हा घडताना दिसत आहे. या सिनेमात अमिताभ तापसीला सोडवण्यात यशस्वी ठरतात का ते सिनेमा रिलीज झाल्यावर कळेलच. सुजॉयच्या मागील द सिनेमांप्रमाणेच हा सिनेमादेखील प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल यात शंका नाही

Recommended

PeepingMoon Exclusive