By  
on  

‘तुझ्या प्रेमाच्या तेजामुळे जीवनातील अंधार दूर गेला आहे, पाहा कोण म्हणत आहे असं

सध्या वातावरणात व्हॅलेंटाईन फीव्हर अशा वेळी सेलिब्रिटी तर कसे मागे राहतील. बॉलिवूडमधील हॉट कपल्सनीदेखील त्यांच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन साजरा करायला सुरुवात केली असेल. त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे मिलिंद सोमण आणि अंकिता. मिलिंद आणि अंकिताचा हा लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाईन आहे. त्यामुळे अर्थातच दोघांसाठी तो खुप खास असणार आहे.

https://www.instagram.com/p/Btx1ogVHS-6/?utm_source=ig_web_copy_link

अंकिताने नुकताच सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात दोघंही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. जणू दोघंही हे जग विसरून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत असं दिसून येत आहे. या फोटोला अंकिताने कॅप्शनही तितकंच रोमॅंटिक दिलं आहे. अंकिता म्हणते,  ‘तुझ्या प्रेमामुळे निर्माण झालेल्या तेजामुळे जीवनातील अंधार दूर झाला आहे. तुझ्यासोबत जीवनातील प्रत्येक क्षण व्यतीत करायचा आहे. तुझ्यात स्वत:ला हरवून जायचं आहे’. अंकिताच्या या कॅप्शनवरुन दोघांमधील प्रेमाचे बंध किती घट्ट आहेत हेच दिसून आलं आहे. दोघांमधील वयाच्या अंतराचा नात्यावर काहीही परिणाम झालेला नाही हेच यातून दिसून येत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive