By  
on  

बॉलिवूडच्या या जोड्या आहेत ‘सिझलिंग कपल’, पाहा कोण कोण आहे या यादीत

जगभर प्रेमाचा संदेश देणा-या व्हॅलेंटाईन डेची सर्वत्र धुम आहे. ज्याला त्याला आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याची इच्छा आहे. अशा वेळी बॉलिवूडकर यापासून कसे लांब राहतील. बॉलिवूडमध्येही अशा काही जोड्या आहेत ज्यांनी प्रेम करुया खुल्लम खुल्ला चा नारा देत सोशल मिडियावरून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. पाहुयात कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी

रणबीर-आलिया:  बॉलिवूडमधील सगळ्यात क्युट कपल म्हणून या दोघांची ओळख आहे. ब्रम्हास्त्र सिनेमाच्या सेटवर या दोघांची ओळख झाली. तिथूनच या दोघांच्यातील नातंही फुललं. सोनमच्या लग्नात एकत्र एंट्री घेतल्यावर माध्यमांसह प्रत्येकाचंच लक्ष रणबीर आणि आलिया या जोडीने वेधून घेतलं होतं. चाहत्यांनी या जोडीला प्रेमाने ‘रालिया’ असं नाव दिलं आहे.

फरहान-शिबानी: रॉकस्टार फरहान अख्तरने पत्नी अधुनासोबत फारकत घेतल्यापासून बराच काळ एकटा होता. पण शिबानी दांडेकरने त्याचा आयुष्यातील प्रेमाची कमतरता भरून काढली आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं हे जोडपं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे फरहानच्या घरच्यांशीही शिबानीची चांगलीच गट्टी जमली आहे.

अर्जुन -मलायका: प्यार किया तो डरना क्या या उक्तीला शब्दश: सार्थ ठरवत या जोडीने एकत्र येण्याचं ठरवलं आहे.  कारण मलायकासाठी अर्जुनने खुद्द सल्लूभाईच्या कुटुंबियांशी वैर पत्करलं आहे.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी: बी टाऊनमधील क्युट कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. टायगर आणि दिशा अनेकदा डेटवर जाताना स्पॉट झाले आहेत. या दोघांचं नातं एकमेकांच्या घरच्यांनाही मान्य असल्याने यांच्या डोक्यावर कधी अक्षता पडणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive