By  
on  

व्हॅलेंटाईनचा मुहुर्त साधत सलमान खानने केलं आगामी ‘नोटबुक’ सिनेमाचं पोस्टर रिलीज

बॉलिवूडचा मसल मॅन सलमान खानने त्याच्या सोशल मिडियावरून ‘नोटबूक’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. या सिनेमात जहीर इकबाल आणि प्रनुतन बहल मुख्य भूमिकांमध्ये दिसत आहेत.

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1095933206845566976

नितीन कक्कड या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमातून जहीर इकबाल आणि प्रनुतन बहल ही फ्रेश जोडी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाचा बराच मोठा भाग काश्मीरमध्ये चित्रित केला आहे. नोटबुकच्या कथेनुसार चित्रिकरणासाठी काश्मीर हेच योग्य ठिकाण असल्याचे या सिनेमाच्या पार्श्वभूमीसाठी निवड केल्याचं सांगितलं आहे.
सलमाने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत असं कॅप्शन दिलं आहे की, ‘काय एकमेकांना न भेटताही प्रेम होऊ शकतं का?’ रोमॅंटिक ड्रामा प्रकारात मोडत असलेला हा सिनेमा यावर्षी रिलीज होत आहे.
अभिनेता जहीर याला सिनेमाची पार्श्वभूमी नाही तर प्रनुतन बहल ही अभिनेत्री नुतन यांची नात आणि अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी आहे. हा सिनेमा २९ मार्च २०१९ ला रिलीज होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive