By  
on  

गायिका अपेक्षा दांडेकरच्या लग्नात शिबानीसोबत फरहान अख्तरची हजेरी

शिबानी, अनुषा यांची बहिण आणि गायिका अपेक्षा दांडेकर हिचं नुकतंच लग्न झालं. यावेळी तिघी बहिणींची धमाल केमेस्ट्री दिसून आली. अपेक्षाने अभिनेता अभिषेक सिंगसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिषेक ‘निमकी मुखिया’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आला होता. हा विवाहसोहळा दिल्लीमध्ये पार पडला. अपेक्षा शिबानी आणि अनुषा यांची सगळ्यात लहान बहिण आहे. अपेक्षाने आतापर्यंत वेडिंग पुलाव आणि बेबी सिनेमात पार्श्वगायन केलं आहे.

अपेक्षा आणि अभिषेक बरीच वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. या सोहळ्यास अभिषेकचे सहकलाकार भूमिका गुरुंग, रिषी खुराणा आणि इंद्रनील सेनगगुप्ता हे हजर होते. याशिवाय करण कुंद्रा, फरहान अख्तर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनुषा म्हणते, ‘माझी लहान बहिण आता नवरी होणार आहे. माझा अजुनही यावर विश्वास बसत नाहीये. ती आमच्यासाठी कायमच लहान राहील. तिला अभिषेक इतका चांगला मुलगा मिळाला नसता. अभिषेक चांगला मुलगा आहेच, याशिवाय मला एक भाऊ मिळाल्याचा आनंद आहे.

https://www.instagram.com/p/BtpgHT5gh5j/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive