By  
on  

पुलावामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी गोरेगाव फिल्मसिटीने पाळला बंद

पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनातील संताप पराकोटीला पोहोचला आहे. देशाच्या प्रत्येक स्तरातील व्यक्तीने या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून गोरेगाव फिल्मसिटीतही बंदचं आवाहन केलं गेलं. सिनेकामगार संघटनेने हा बंद पुकारला आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1096982625837674497

आज दिनांक १७ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेमध्ये संपूर्ण चित्रपटनगरीमधील कामकाज बंद राहिलं होतं. या काळात कोणतंही पोस्ट प्रॉड्क्शन किंवा चित्रिकरणाचं काम केलं गेलं नाही. या दरम्यान फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या संघटेनेमार्फत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच हा दिवस ‘ब्लॅक डे’ म्हणून पाळला जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive