By  
on  

सान्या मल्होत्रा दिसणार या सिनेमात, हा अभिनेता असणार आहे सोबत

‘दंगल’ गर्ल’ सान्या मल्होत्राचे तारे सध्या सातव्या आसमानवर आहेत. कारण दंगल नंतरा सलग बधाई हो हा सिनेमा हिट झाला आहे. आता सान्या अजून एका सिनेमाच्या तयारीला लागली आहे. सोशल मिडियावर अलीकडेच या सिनेमाच्या सेट वरचा फोटो शेअर केला गेला. विशेष म्हणजे आदित्य रॉयकपूरही या सिनेमातून पदार्पण करणार आहे. आदित्य बराच काळानंतर सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अदित्यने इन्स्टाग्रामवरून या सेटवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सान्या मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर आणि अनुराग बासू दिसत आहे. हा सिनेमा अ‍ॅक्शन आणि कॉमेडी असल्याचं बोललं जात आहे. ६ सप्टेंबरला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदरर्शित होईल.

https://www.instagram.com/p/Bt8ZqL6nMkQ/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive