By  
on  

सान्या मल्होत्राचा सिनेमा ‘फोटोग्राफ’चा ट्रेलर रिलीज, नवाजुद्दीन दिसला विशेष भूमिकेत

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा अभिनीत पुरस्कार विजेता दिग्दर्शक रितेश बत्राच्या ‘फोटोग्राफ’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात नवाजुद्दीन रस्त्यावरच्या फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहे. जगण्याशी संघर्ष करणारा हा फोटोग्राफर ‘लग्नाळू’ आहे. आजीच्या इच्छेखातर एका लाजाळू मुलीला आपली प्रेयसी असल्याचा अभिनय करण्यास विनंती करतो. तीही होकार देते. या प्रवासातून एक हळूवार प्रेमकहाणी उलगडत जाते ते पहाणं रंजक ठरणार आहे.

नवाजुद्दीनचा कसदार अभिनय रसिकांना या सिनेमातून पहायला मिळेल यात शंका नाही. सान्याबरोबर त्याची हटके केमिस्ट्री कशी असेल ते लवकरच कळेल. हा सिनेमा सर्वप्रथम सनडान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखवला गेला होता. त्यानंतर बर्लिन फेस्टीव्हल मध्येही या सिनेमाने पसंतीची पावती मिळवली होती. समीक्षकांनींही या सिनेमाचं चांगलं कौतुक केलं आहे. हा सिनेमा १५ मार्च २०१९ ला रिलीज होणार आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=154&v=hUL2z8Ps_Ik

Recommended

PeepingMoon Exclusive