By  
on  

येणार का ‘नायक’ सिनेमाचा सिक्वेल? अनिल कपूरला उत्सुकता

अनिल कपूर यांच्या नायक उल्लेखनीय सिनेमाचं नाव आजही रसिकांच्या मनात आहे. त्यामुळेच की काय या सिनेमाचा सिक्वेल यावा असं अनिल कपूर यांनादेखील वाटतं. अलीकडेच स्टार स्पोर्ट्स स्टुडिओमध्ये ते याविषयी बोलत होते. राजकिय कथेचा बाज असलेला नायक सिनेमा   अ‍ॅक्शन थ्रिलर होता. हा एस. शंकर यांच्या प्रसिद्ध तमिळ सिनेमा ‘मुधवन’ याचा रिमेक होता. २००१ मध्ये आलेल्या या सिनेमात साध्या तंत्राने सिस्टीम विरोधात लढणा-या पत्रकाराची गोष्ट दाखवली आहे. यात राणी मुखर्जी आणि दिवंगत अमरीश पुरी यांनी भूमिका केली आहे.

अनिल सध्या टोटल धमाल या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तो माधुरीसह झळकत आहे. रसिकांना खुप वर्षांनी या सुपरहिट जोडीला एकत्र पाहण्याची संधी टोटल धमालमध्ये मिळत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive