By  
on  

सोनाक्षी सिन्हामुळे या व्यक्तीने केलं विषप्राशन, पोलिसांकडून चौकशी सुरु

‘दबंग’गर्ल सोनाक्षी सिन्हावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाक्षीमुळे एका कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद शर्मा यांनी विषप्राशन केल्याचा प्रकार घडला आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. पैसे घेऊनही प्रमोद यांच्या कार्यक्रमाला सोनाक्षी उपस्थित न राहिल्याने हा प्रकार घडला आहे.

३० सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड्सचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सोनाक्षीला बोलावण्यासाठी टॅलेंट फुलऑन कंपनीचे संचालक अभिषेक सिन्हा आणि एक्सीड एंटरटेन्मेंटशी संपर्क साधण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी सोनाक्षीने तब्बल २४ लाख इतकी रक्कम घेतली व ज्या कंपनीमार्फत हा व्यवहार करण्यात आला त्यांनाही पाच लाख रुपये इतके कमिशन द्यावे लागले होते.

सोनाक्षी येणार म्हणून या इव्हेंटसाठी प्रचंड जाहिरात आणि होर्डिंग्सही लावण्यात आले. कार्यक्रमाला गर्दीही मोठ्या प्रमाणावर जमली. परंतु ऐनवेळेस ती न आल्याने जमलेल्या जमावाने खुप तोडफोड आणि गोंधळ घातला.

या प्रकरणामुळे १३ फेब्रुवारीला अयोजक प्रमोद शर्माने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोप दाखल करून घेण्यास दिलेल्या नकारामुळे प्रमोद यांना हे पाऊल उचलावं लागल्याचं बोललं जात आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive