By  
on  

का थांबलं होतं दोन दिवसांसाठी ‘हाऊसफुल ४’चं शुटिंग, कृती सॅनॉनने केला खुलासा

बॉलिवूडमधील एक काळ ‘मीटू’च्या प्रकरणांनी गाजवला होता. अनेक मोठी मोठी नावं या प्रकरणत समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दिग्दर्शक साजिद खानचं नावही या प्रकरणात समाविष्ट होतं. त्यामुळे लगोलग साजिदच्या हातून या सिनेमाच्या दिग्दर्शकपदाची धुरा काढून घेतली गेली. त्यानंतर फरहाद सामजी यांच्या हाती सिनेमाची सुत्रं सोपवली आहे. तरा राणा दग्गुबातीने नाना पाटेकरला रिप्लेस केलं होतं. या घटनांना न्याय देण्याचं श्रेय अभिनेत्री कृती सॅनॉनने निर्माता साजिद नाडियाडवालाला दिलं होतं.

या बद्द्ल बोलताना अभिनेत्री कृती सॅनॉन म्हणते, हाऊसफुल ४च्या शुटिंग दरम्यान आम्ही अनेक बातम्या ऐकून निराश झालो होतो. पण या बाबीबद्दल लोक बोलत आहेत याचा आनंद होता. पण हाऊसफुल ४च्या बाबतीत साजिद नाडियाड्वाला यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे शुटिंग फार काळ बंद राहू शकलं नाही. या चळवळीने बॉलिवूडमध्ये एक चांगली सुरुवात केली आहे. या प्रकरणानंतर मी हाऊसफुलच्या सेटवर स्वत:ला कधी असुरक्षित नाही समजलं.’

Recommended

PeepingMoon Exclusive