By  
on  

ही अभिनेत्री थिरकणार गरब्याच्या तालावर, आगामी सिनेमासाठी शिकतीये गरबा

अभिनेत्री मौनी रॉयचे तारे सध्या सातवे आसमानवर आहेत. पदार्पणातील पहिला सिनेमा अक्षयकुमारसोबत मिळालेल्या भूमिकेमुळे तिचा बॉलिवूडमधील भाव चांगलाच वधारला आहे. मौनी तिच्या आगामी सिनेमाच्या तयारीत गुंतली आहे. आगामी सिनेमात ती राजकुमार रावसोबत ‘मेड इन चायना’ या सिनेमात झळकताना दिसेल.

https://www.instagram.com/p/BuDvR_alGDo/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमासाठी मौनी गरब्याचं प्रशिक्षण घेत आहे. मुळात मौनी उत्तम नृत्यांगना आहे. पण पडद्यावर गरबा परिपूर्ण दिसण्यासाठी तिने खास प्रशिक्षण घ्यायलाही सुरुवात केली. इंटरनेटवर तिने गरब्याचे व्हिडिओही पाहिले आहेत. त्यामुळे आता बॉलिवूडची ही सौंदर्यवती गरब्याच्या तालावर थिरकणार हेच खरं.

https://www.instagram.com/p/Btqk9u9Flo8/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive