By  
on  

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; झळकणार या हिंदी मालिकेत

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे नाव म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज नाव. त्यांच्या भूमिकांना कायमच एक दर्जेदार स्थान असतं. सिनेमा असो मालिका किंवा नाटक प्रत्येक ठिकाणी ते आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतात.'के दिल अभी भरा नही' या रंगभूवरील अलिकडेच आलेल्या  त्यांच्या नाटकानं प्रेक्षकांची मनं जिंकली तर नटसम्राट या सुपरहिट मराठी सिनेमातील विक्रम गोखले यांनी साकारलेली व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरली.

मराठी सोबतच हिंदीतही त्यांच्या अभिनयाचा एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं आहे. लवकरच ते आता छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करतायत. स्टार प्लसवरील दिव्य दृष्टी या हिंदी मालिकेत विक्रम गोखले हे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही असामान्य अशा दोन बहिणींची कथा आहे. दैवी शक्तीचं त्यांना वरदान प्राप्त असतं. एकीला भविष्य दिसतं तर दुसरीला ते बदलण्याची ताकद असते. परंतु दृष्टींपासून सावध राहणं त्यांना आवश्यक असतं. या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत विक्रम गोखले पाहायला मिळतील.

यापू्र्वीसुध्दा विक्रम गोखले यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

https://twitter.com/StarPlus/status/1099323655027343360

Author

Recommended

PeepingMoon Exclusive