By  
on  

अनुप जलोटा आणि जसलीन मथारु यांच्यात शिजतंय तरी काय?

बिग बॉस हा शो मनोरंजनापेक्षा विवादासाठीच अधिक ओळखला जातो. यात येणारे स्पर्धक जणू काही वाद निर्माण करण्यासाठीच येत असावेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अनुप जलोटा आणि जसलीन मथारू.

या जगावेगळ्या जोडीने रसिकांना आश्चर्याने तोंडात बोटं घालायला भाग पाडलं. त्यांच्या आगमनापासूनच नात्याविषयी रसिकांना उत्सुकता होती. पण या बेगडी नात्याचे पापुद्रे हळूहळू निघाले आणि खरं वास्तव समोर आलं. हे नातं केवळ शोमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलं गेल्याचं सांगितलं गेलं.

https://www.instagram.com/p/BuOVz0YlRUg/?utm_source=ig_web_copy_link

पण या नात्यात पुन्हा बहार येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. जसलीनने अलीकडेच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात ती अनुप जलोटांसोबत गाणं म्हणताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘अनुप जलोटा यांच्यासोबत मी आवडतं गाणं गात आहे. ‘वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते है’... किती सुंदर गाणं आहे ! या दोघांच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive