By  
on  

करीना कपूर खान ‘बेबी बंप’सोबत झाली स्पॉट, करीनाकडे आहे का ‘गुडन्युज’?

लाईम लाईट्मध्ये कसं रहायचं हे करीना कपूर खानला चांगलंच ठावूक आहे. आताही करीना एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच करीना बेबी बंपसहित शुटिंग लोकेशनवर स्पॉट झाली. तिच्याकडे पाहून करीना पुन्हा गुडन्युज देणार आहे की काय अशी चर्चा सुरु झाली.

पण चाहत्यांसाठी आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, करीना गुडन्युज देणार आहे हे खरं आहे, पण ही गुडन्युज रीअल लाईफमधील नाही तर रील लाईफमधील आहे. करीना अक्षय कुमारसोबत ‘गुड न्युज’ या सिनेमात झळकणार आहे.

गुड न्युज हा एक रोमॅंटिक कॉमेडी प्रकारचा सिनेमा आहे. घरी बाळ येणार हे समजल्यावर एका जोडप्याच्या आयुष्यात होणारे बदल आणि प्रसंगांचं चित्रण विनोदी पद्धतीने करण्यात आलं आहे. या सिनेमाचं शुटिंग पंजाबमध्ये केलं जाईल. सिनेमाच्या सेकंड आणि थर्ड शेड्युलमध्ये अक्षय आणि करीना एकत्र आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन करण जौहर करत आहे. करीना त्याच्या ‘तख्त’मध्येही झळकणार आहे. तुर्तास चाहत्यांना करीना आणि अक्षयच्या एकत्र दिसण्याची उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive