By  
on  

नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा दिसणार राधिका आपटेसोबत झळकणार या सिनेमात

नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा राधिका आपटेसोबत अभिनयाचे जलवे दाखवणार आहे. ही जोडी यापुर्वी ‘बदलापुर’ आणि  ‘मांझी-द माउंटेन मैन’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. ही जोडी हनी त्रेहानचा पहिला सिनेमा ‘रात अकेली है’ मध्ये झळकणार आहे. या सिनेमात या दोघांसोबत श्वेता त्रिपाठी पण झळकणार आहे. हा सिनेमा एक रोमॅंटिक थ्रिलर असणार आहे. यात इला अरुण, तिग्मांशू धुलिया, स्वानंद किरकिरे, खालिद तय्यबजी यांच्या भूमिकाही असणार आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा कानपुरच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. नवाज एक शोध अधिका-याच्या भूमिकेत असणार आहे. हा एका हाय-प्रोफाईल केसवर काम करत असतो. त्यावेळी त्याची भेट  श्वेता आणि राधिकाशी होते. या सिनेमाचं शुटिंग लखनऊ आणि ग्वालियरमध्ये केलं जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive