By  
on  

दर्पोक्ती करणा-या अली जफरला परेश रावल यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिलं सणसणीत उत्तर

सध्या जगभर चर्चा आहे ती भारताच्या एअर स्ट्राईकची. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन हवाई हल्ल्याच्या सहाय्याने ३००च्या वर अतिरेक्यांना यमसदनाला पाठवलं. या कारवाईने देशभर उत्साहाचं वातावरण आहे. बॉलिवूडनेही या कारवाईचं जोशपूर्ण शब्दात कौतुक केलं आहे. अभिनेता परेश रावल यांनीही ट्वीट करत पकिस्तानी अभिनेता अली जफर याची अप्रत्यक्षरित्या चांगलीच कानउघडणी केली आहे.

https://twitter.com/SirPareshRawal/status/1100336846897324033

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणावर पकिस्तानी कलाकार अली जफर याने भाषणाचं समर्थन करत ‘व्हॉट अ स्पीच’ असं ट्वीट केलं होतं. एअर स्ट्राईकनंतर परेशजींनी जफरला अप्रत्यक्षरित्या टोमणा मारत म्हणलं आहे ‘नाऊ स्पीचलेस’.

Recommended

PeepingMoon Exclusive