By  
on  

कंगनाने ‘मेंटल है क्या’? ची पुढे ढकलली रिलीज डेट, चाहत्यांमध्ये उत्सुकता

कंगना राणौतचे तारे सध्या चांगलेच फॉर्मात असल्याचं दिसून येत आहे. याला कारण म्हणजे मणिकर्णिकाला मिळालेलं यश. तिच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ सिनेमाने तिला अभिनेत्री आणि दिग्दर्शक अशा दोन्ही पातळ्यांवर यश मिळवलं आहे. कंगना आगामी ‘मेंटल है क्या’ मधून रसिकांच्या भेटीला येत आहे.

https://twitter.com/ektaravikapoor/status/970505828678623232

पण आताच हाती आलेल्या महितीनुसार कंगनाने मेंटल है क्या?च्या प्रदर्शनाची तारीख बदललेली आहे. कंगनाच्याच सांगण्यावरून दिग्दर्शकांनी ही तारीख बदलल्याचं समजत आहे. हा सिनेमा २९ मार्चला रिलीज होणार होता. पण आता तो मे मध्ये रिलीज होणार असल्याचं समोर आलं आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार रावही दिसत आहे.या सिनेमाची तारिख पुढे ढकलण्याचं कारण म्हणजे मणिकर्णिकाचा प्रभाव.

https://www.instagram.com/p/BgFydhVltu8/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमाने लोकांवर चांगला प्रभाव निर्माण केल्याचं दिसून येत आहे. अशा वेळी एक ब्लॅक कॉमेडी सिनेमा येऊ नये असं कंगनाला वाटत आहे. त्यामुळेच मेंटल है क्या?च्या रिलीजसाठी रसिकांना काही काळ वाट पहावी लागेल असं दिसत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive