By  
on  

२६/११ चे जांबांज अधिकारी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर बायोपिक

सध्या बायोपिकच्या लाटेत बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीसहित टॉलिवूडही सहभागी झालं आहे. आता अभिनेते महेश बाबूची जीएमबी एंटरटेनमेंट संस्था एका बायोपिकची निर्मिती करणार आहे. यासोबतच सोनी पिक्चर्सही सहनिर्माता आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील जांबांज अधिकारी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर महेशबाबू सिनेमा काढत आहेत.

हा सिनेमा तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होईल. या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत अभिनेता अदिवी सेश हा अभिनेता झळकणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचं लेखनही अदिवी सेश यानेच केलं आहे. ‘मेजर’ असं या सिनेमाचं नाव आहे.

https://twitter.com/urstrulyMahesh/status/1100705930008645634

मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यामध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन हे एनएसजी कमांडो शहिद झाले होते. त्यांच्या शौर्याचं स्मरण ठेवूनच हा सिनेमा बनवला जात असल्याचं महेशबाबू यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/AdiviSesh/status/1100707048034131968

 

Recommended

PeepingMoon Exclusive