By  
on  

रेणुका आणि आशुतोष राणा एकत्र झळकणार या मालिकेत, पाहा कोणती आहे ही मालिका

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा ही सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आहे. अनेका कार्यक्रमातून ही जोडी एकत्र दिसली असली तरी एकाच कार्यक्रमात झळकण्याचा योग मात्र आता जुळून आला आहे. स्टार भारतवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सावधान इंडिया’. आसपास घडत असलेल्या गुन्ह्यांबद्द्ल जागरुकता निर्माण करण्याचं काम ही मालिका करत असते. या मालिकेच्या सुत्रसंचलनाची धुरा सध्या आशुतोष राणा यांच्याकडे आहे.

रेणुकाजी लवकरच या मालिकेच्या एका भागात झळकणार आहेत. एका घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कशाप्रकारे बदलतं हे या भागात दाखवलं जाईल. या भागाची कथा ऐकल्यानंतर रेणुकाजी खुपच प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी या भागात काम करण्यासाथी होकार दिल्याचं समजतं.

Recommended

PeepingMoon Exclusive