By  
on  

शत्रूला चकवा देणा-या ‘रॉ’ एजंटच्या भूमिकेत दिसणार जॉन अब्राहम, ‘रॉ’चा ट्रेलर रिलीज

रॉ या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहम गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. देशासाठी जिवाचीही पर्वा न करणारा गुप्तहेर रॉ मध्ये जॉन अब्राहमने साकारला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल करत आहे. या सिनेमात जॉनसोबत सुचित्रा कृष्णमूर्ति, जैकी श्रॉफ आणि सिंकदर खेर दिसून येतील. Viacom18 Motion Pictures Pictures, KYTA Productions आणि VA Film Company या तीन कंपन्या या सिनेमाच्या निर्माता आहेत.

https://www.youtube.com/watch?time_continue=166&v=HSHjC8VdzCM

या सिनेमात जॉन २६ वर्षांच्या युवकापासून ते ८५ वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. या सिनेमात त्याने जवळपास २८ व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. एका सत्यकथेवर हा सिनेमा बेतला आहे. ही घटना १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान घडली होती. याशिवाय या सिनेमात मौनी रॉयदेखील आहे. या सिनेमाचं शुटिंग गुजरात, नेपाळ आणि काश्मीरमध्ये झालेलं आहे. खरं तर हा सिनेमा सर्वात आधी सुशांत सिंग राजपूतला ऑफर झाला होता. पण त्याने नकार दिल्याने ही संधी जॉनला मिळाली. हा सिनेमा ५ एप्रिलला रिलीज होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive