By  
on  

‘मलंग’ या सिनेमात दिसणार ही जोडी, रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र

सध्या दिशा पटानी बॉलिवूडचं हॉट सेंसेशन असलं तरी टायगरसोबत एंगेज असल्याच्या बातम्यांनी अजूनही प्रसिद्धीच्या झोतात येत असते. दुसरीकडे पहिल्या सिनेमाच्या यशाने तरुणींचा लाडका बनलेला अभिनेता आदित्य रॉय कपूर आता स्क्रीन शेअर करणार आहे. ही युथफुल जोडी आता ‘मलंग’ सिनेमातून एकत्र येत आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1102419312277504000

सिनेसमीक्षक तरन आदर्श यांनी ट्वीटकरून ही बातमी शेअर केली आहे. मोहीत सूरी ‘मलंग’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभळताना दिसून येणार आहे. चित्रपटात आदित्य आणि दिशाशिवाय अनिल कपूर आणि कुणाल खेमूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. भूषण कुमार आणि लव रंजन हे या सिनेमाचे निर्माते आहेत. २०२० च्या व्हॅलेंटाईन डे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून पहिल्यांदाच आदित्य आणि दिशा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive