By  
on  

फरहानने शेअर केला अंगठ्यांचा फोटो, चाहत्यांकडून तर्क-वितर्कांना उधाण

फरहान आणि शिबानी हे सध्या लाईमलाईटमधलं कपल आहे. त्यांच्याविषयी अनेक बातम्या सतत प्रकाशझोतात असतात. दोघेही आपल्या प्रेमाची जाहीर कबूली द्यायला किंवा प्रेम व्यक्त करायला जराही कचरत नाहीत.

https://www.instagram.com/p/Bui-qvGBmF5/?utm_source=ig_web_copy_link

फरहानने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोवरून त्यांनी साखरपुडा केलाय कि काय अशी शंका चाहत्यांना येत आहे. या फोटोत फरहान आणि शिबानीने बोटात अंगठी घातलेली दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Bts3cPZhq1j/?utm_source=ig_web_copy_link

या अंगठ्या साखरपुड्याच्या वाटत नसल्या तरी कमिटमेंटच्या नक्कीच वाटत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘हात पकडणं ही कृती खुप महत्वाची असते. काही न बोलताही खुप काही सांगता येतं. फरहान आणि शिबानी २०१८पासून एकमेकांना डेट करत आहेत. फरहान आता ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

https://www.instagram.com/p/BuFmCSdBr56/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive